‘या’ मुद्यांवरून साधला सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाल्या कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

केंद्र सरकारकडून खासदारांना त्यांच्या मतदार संघात विविध विकास कामांवर खर्च करण्यासाठी खासदार फ़ंडातून निधी दिला. केंद्र सरकारने कोरोनाचे कारण देत सर्व खासदारांना निधी देणे बंद केले असल्याची टीका सुळे यांनी यावेळी केली.

साताऱ्यात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारकडून काहीशा प्रमाणात निधीला दिला जातो. मात्र, अनेक खासदारांनी निधी वापरला नाही याचे आश्चर्य वाटत आहे. यामागचे कारण म्हणजे केंद्र सरकारने कोरोनाचे कारण देत सर्व खासदारांना निधी देणे बंद केले आहे. मला स्वतःही कोरोनाच्या काळात दोन वर्षे झाले निधी मिळालेला नाही.

यावेळी सुळे यांनी गणेश नाईक यांच्यावर झालेल्या आरोपांबाबतही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांवर अत्याचार होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे. यामध्ये लहान मुले असतात त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. महिलेवर अन्याय होत असेल तर राजकारणातील विषय नसून तो सामाजिक विषय असल्याचे सुळे यांनी म्हंटले.

Leave a Comment