हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार यांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक पक्षाला सोडून जात आहेत…राष्ट्रवादी बालेकिल्ला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार नेत्या सोनिया दुहान (Sonia Duhan) यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करताना खासदार सुप्रिया सुळेंवर केलेले हे गंभीर आरोप… खरंतर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीची तुतारी महाराष्ट्रात जोरदार वाजणार असल्याचं सगळेजण सांगू लागलेत. अगदी कमी वेळेत हतबल न होता शरद पवारांनी पक्षाची नवी फळी तयार केली… एकनिष्ठांना बळ दिलं. पक्षात नव्या आणि युवा चेहऱ्यांना संधी देण्याचं शरद पवारांचं धोरण असताना अचानक आता पक्षातीलच तरुण तडफदार नेत्या सोनिया दुहान यांनी केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय …मी फक्त आणि फक्त सुप्रिया सुळेंमुळेच पक्ष सोडतेय, असं म्हणत सोनिया यांनी सुप्रियाताईंच्या नेतृत्व क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलय… मग या सगळ्या टाइमलाईन चा विचार केला तर अजित दादांपासून ते सोनिया दुहानपर्यंत राष्ट्रवादीच्या झालेल्या पडझडीला पवारांचीच मुलगी म्हणजे सुप्रियाताईच जबाबदार आहेत का? सुप्रियाताई आणि त्यांच्या सर्कल मधल्या खास माणसांमुळे शरद पवारांचीही राष्ट्रवादी संपत चाललीय काय? सुप्रिया सुळे पक्ष चालवण्यासाठी खरंच सक्षम नाहीयेत का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहुयात
सुप्रिया सुळे शरद पवारांचा पक्ष संपवतायेत असं बोलण्यामागचं पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीत घडलेला एकूणच घटनाक्रम…
राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी सगळं काही सॉर्टेड होतं. सुप्रियाताई युवती आघाडी सांभाळत बारामतीच्या खासदार म्हणून काम पाहत होत्या. पक्ष विस्तार करणे, पक्षाचे नेतृत्व करणं हे सगळं काही एक वेगळीच टीम पाहत होती. पण जेव्हा पक्ष पुढच्या पिढीकडे हस्तांतर करण्याची वेळ आली तेव्हा शरद पवारांनी अजितदादांपेक्षा सुप्रिया ताईंना झुकतं माप दिलं. खरं तर आपल्याला पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी इच्छा अजितदादांनी त्याआधीच अप्रत्यक्षपणे पक्षाच्या एका मेळाव्यात बोलून दाखवली होती. आमदार खासदार, पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कनेक्ट हा सुप्रिया ताईंपेक्षा दादांकडे जास्त होता. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकल्यानंतर घडलेल्या नाट्यात अजितदादांनी दाखवलेला डॉमिनन्स आणि सुप्रिया तू बोलू नको, मोठा भाऊ म्हणून तुला सांगतोय… असं दादांनी केलेलं स्टेटमेंट हे सगळं पाहता अजितदादा यांच्याकडे नेतृत्वाची कमान सोपवण्यात येईल, असं सगळ्यांनाच वाटत होतं. पक्षातील अजितदादा गटही मोठा असल्याने अजितदादांना झुकतं माफ देण्यात यावं असा एकूणच पक्षातील अनेक नेत्यांचा सुर होता. मात्र शरद पवारांनी कार्यकारणीची फोड केली आणि त्यात सुप्रिया ताई यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा म्हणून जाहीर केलं. त्यांच्यासोबत इतर नेत्यांनाही कार्यकारणीत घेण्यात आल्यावर अजितदादांना यात मात्र कुठेही स्थान नव्हतं. अध्यक्षपदासाठी दादा रेसमध्ये उजवे असतानाही सुप्रियाताईंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे दादा गटाचा नाईलाज झाला. आणि त्यांनी मोठं पाऊल उचलल्याचं अनेकजण सांगतात.
दुसर कारण सोनिया दुहान यांनी सांगितलं ते नेतृत्व क्षमतेबद्दल…
कामाचा माणूस म्हणून अजितदादांची महाराष्ट्रात ओळख आहे. अजितदादा सर्वसामान्यांसाठी इझीली अवेलेबल असतात. जनतेची काम तिथल्या तिथे निकालात काढण्याची त्यांची स्टाईल सर्वांनाच माहित आहे. विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला फोडलेला घाम असो की उपमुख्यमंत्रीपदावर असताना केलेली कामं आमदारांपासून ते स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना दादांच्या नेतृत्व आणि कार्यक्षमतेवर विश्वास होता. दुसरीकडे सुप्रियाताईही राजकारणात असल्या तरी खासदार म्हणून त्यांचं असणारं काम त्या चोख बजावत होत्या. सुप्रियाताई निधी आणून अजित दादांकडे सोपावत होत्या. याला प्रतिवाद करताना अजितदादांच्या कार्यक्षेत्रात आपण ढवळाढवळ करायची नाही असा युक्तिवाद त्या करत असल्या तरी यामुळे नकळत अजितदादा यांची स्थानिक राजकारणावरच्या पकडीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे नेतृत्व क्षमतेचा फिल्टर लावायचा झालाच तर सुप्रिया ताईंपेक्षा अजितदादा उजवे असताना त्यांना केवळ ताईंच्या हट्टापोटीच डावलण्यात आल्याचा आरोप अजितदादा गटाकडून करण्यात येतो. त्यामुळे शरद पवारांनी वाढवलेल्या राष्ट्रवादीला पक्ष फुटीचा जो मेजर झटका बसला तो मुलीच्या प्रेमापोटी बसला असाही दादा गटाचा आरोप असतो.
शेवटचं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे सुप्रिया सुळे समर्थक गट.
राष्ट्रवादीत स्पष्ट दिसत नसली तरी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक असे दोन गट होते. सुप्रिया सुळे गटातील नेत्यांना शरद पवारांचा हा डायरेक्ट ऍक्सेस असायचा. पण अजित पवार गटातील नेत्यांना आपला प्रश्न आधी अजित दादांकडेच मांडावा लागायचा. यातून या दोन गटातील चढाओढ आणि इर्षा वाढत गेल्याचं अनेकजण सांगतात. प्रत्यक्ष पक्ष फुटीनंतर कोण कुठल्या गटात आहे हे चित्र स्पष्ट झालं. तेव्हा त्यांचा एकमेकांविषयी असणारा आकस त्यांनी उघडपणे बोलायला सुरुवात केली. सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत. सुप्रियाताईंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचं, हटवण्याचं आणि मजबूर करण्याचं काम करत आहेत. पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दूहान यांनी केलेल्या या आरोपांमुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील सुप्रिया ताईंच्या जवळच्या नेत्यांकडूनच उरल्या सुरल्या पक्षातीलही काम करणाऱ्या नेत्यांवर प्रेशर टाकण्यात येतय, असा आरोप दूहान यांनी केल्यामुळे आता सुप्रियाताई चांगल्याच अडचणीत आल्या आहेत…
हे पण वाचा : भाजपने ताकद लावूनही इथल्या दिग्गज नेत्यांचा पराभव होतोय
सोनिया दुहान यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे. जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते. अजित पवारांच्या पहाटेच्या बंडावेळी नरहरी झिरवाळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्लीजवळच्या गुरुग्रामधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे दीडशे कार्यकर्ते होते. त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या. त्यामुळे पक्षातील डॅशिंग नेतृत्व पक्ष सोडून जात असल्याने शरद पवार गटासाठी ही गोष्ट नक्कीच विचार करायला भाग पाडणारी आहे…शेवटी सुप्रियाताईंच्या अतिमहत्वकांक्षेमुळेच शरद पवारांचा पक्ष संपत चाललाय? असा करण्यात येणारा आरोप तुम्हालाही पटतो का? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा