देहूतील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या कि..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनाच याचे आश्चर्य वाटले. दरम्यान या घडलेल्या प्रकारावरून आता राजकारण तापू लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला असून पवारांना भाषण करू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे सुळे यांनी म्हंटले आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अजित दादांना भाषण करायचे होते. याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आले होते. कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण पीएमओकडून लेखी उत्तरात त्यांच्या भाषणाला ओके आले नाही. हे अतिशय गंभीर असून मला स्वतला वेदना देणार आहे. कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा, पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा प्रोटोकॉल नुसार सन्मान झालेला नाही. त्यामुळ हे अतिशय धक्कादायक आणि अयोग्य आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर तिथ भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी फडणवीसांना भाषण करू द्यायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे जे झालं ते अयोग्य असल्याचं माझं मत आहे. त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाण लोहगाव विमानतळ देहू आणि देहू ते मुंबई या दोन्ही प्रोटोकॉल प्रमाण अजित दादांना हजर राहणार हो प्रोटोकॉल आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

खुद्द मोदींनीही केले आश्चर्य व्यक्त

आज देहूच्या पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोडले तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र अजित पवार यांचे नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे आता कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे खुद्द मोदी यांनी अजित पवार यांना का बोलू दिले गेलेले नाही अशी विचारणा केली.

Leave a Comment