टीम, HELLO महाराष्ट्र। मागील एक महिना राज्यामध्ये मोठे सत्ता नाट्य घडले. यामुळे राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच चालू होती. मात्र यामध्ये ‘महाविकासाआघाडी’ने बाजी मारत आपली राज्यात सत्तास्थापन केली. मात्र यामध्ये राजकीय पक्षांमधील चर्चा, त्यांचे विश्लेषण, महत्वाचे मुद्दे, त्यांचे निर्णय राज्यातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम पत्रकार आणि टेलिव्हिजन न्यूज वाहिन्यांनी केले.
प्रत्येक बातमी त्यांनी लवकरात लवकर प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची काळजी घेतली. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आज लोकसभेमध्ये आवाज उठवला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सुळे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये दोन पत्रकार त्यांच्या मोटारसायकलवरून शरद पवार यांच्या चालू गाडीच्या बरोबरीने जात असल्याचे दिसत होते. पुढील व्यक्ती गाडी चालवत असून मागील व्यक्ती कॅमेरा पकडून शरद पवार यांना चित्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. त्यावेळी सुळे यांनी फोटो पोस्ट करत पत्रकारांना आपली सुरक्षा राखण्याचे आवाहन केले होते. याच मुद्याचा संदर्भ घेऊन त्यांनी आज लोकसभेत आवाज उठावला आहे. यावेळी त्यांनी बोलताना ‘पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज असून त्याबद्दल सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे’ मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत शून्यप्रहरादरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात आला.(1/2) pic.twitter.com/upTyBkrJj2
— Supriya Sule (@supriya_sule) December 3, 2019
माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो,
ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. pic.twitter.com/HrXTkaw39L— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019