महागाई… महागाई अन् महागाई : सुप्रिया सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण याच्या समाधीस भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुळे यांनी महागाईच्या मुद्यांवरून भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला. “अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांची आज भाषण आठवतात. ते म्हणायचे, भाषणा आणि डेटा बंद करा. ज्यावेळी पोटला भूक लागते तेव्हा अन्नच लागते. तेव्हा आता महागाई होते, तेव्हा सुषमा स्वराज यांची आठवण होते. तेव्हा आकडो से और भाषणो से पेट नही भरता. भूक लगती है तो धान लगता है., असे म्हणत सुळे यांनी टीका केली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या अमोल मिटकरी, राज ठाकरे याच्या भोंग्याच्या प्रश्नाला बाग देत सुळे यांनी केवळ महागाई या मुद्यांकडे लक्ष वेधले.

यावेळी सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया दिली. ‘एखादी व्यक्ती कुठल्याही पदावर असो. तिने जबाबदारीचे भान ठेऊनच बोलले पाहिजे. राज ठाकरे यांनी म्हंटले कि पवार साहेब हे नास्तिक आहेत. त्यांना मंदिरात जाताना कोणी बघितले आहे का? ठीक आहे पवार साहेबांचा तो अधिकार आहे. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. मला वाटते इतकं खालच्या पातळीवरचे राजकारण कुणी करू नये,” असे सुळे यांनी म्हंटले.

निर्मलाताई सीतारामनच्या त्या वक्तव्याचाही समाचार

केंद्र सरकार वास्तवतेपासून किती दूर आहे हे सीतारामन याच्या माध्यमातून जिवंत उदाहरण आहे. आता कुठे तरुण लोक कामाला लागलेले आहे. मी लोकसभेच्या अधिवेशनात गेली एक महिने झाले सातत्याने महागाईवर बोलत होते. आज महागाईसारखा दुसरा कोणताही प्रश्न नाही. कुठेतरी आता आपली सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनात काही कामे केली नाही हे पाहायचे असेल तर या काळात राज्य सरकारने केलेल्या कामाचा डेटा पहावा. प्रचंड कामे झालेली आहेत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/352568616849105/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

 

एकाही खासदाराला केंद्राकडून एक रुपयाचाही फ़ंड दिलेला नाही

केंद्र सरकारकडून दोन वर्षात एक रुपयाचाही फंड एकाही खासदारांना दिलेला नाही. खासदारांनी कोरोना काळात जी कामे केली आहेत. मात्र, तीन वर्षात केंद्राकडूनत्यांना निधी वाटप करण्यात आलेले नाही. मात्र राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक आमदाराला सुमारे पाच कोटी निशी दिला आहे.

पती सदानंद सुळेंच्या नोटिसीवर सुळे म्हणाल्या, ओ नाही नाही नाही….

पती सदानंद सुळे यांना आयकर विभागाच्या ववतीने नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना सदानंद सुळेंना ईडीकडून नोटीस आली आहे. त्याबद्दल काय म्हणाल, असा प्रश्न विचारला. त्यावर सुळे म्हणाल्या कि… ओ नाही नाही नाही.. नोटीस हि आयकर विभागाकडून आलीय ईडीकडून नाही. अरे… लढलुंगी मै… असे म्हणत त्यांनी प्रश्नाचे हसत जास्त उत्तर दिले.

सदावर्ते यांच्या टीकेवर सुळे म्हणाल्या…

गुणरत्न सदावर्ते यांनी पवार कुटूंबावरील केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो. तसे त्याचे संसकार असतात. मी स्वतःला भाग्यवान समजते कि दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे माझ्यावर संस्कार आहेत. मी अशा कोणत्या गोष्टीवर मला संयुक्तीक वाटत नाही. डॉ. आंबेडकरांनी प्रत्येकाला संविधानामध्ये मनमोकळे करण्याचा अधिकार दिलेला आहे, असे सुळे यांनी म्हंटले.

Leave a Comment