हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच रविवारी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) आगामी महापालिका निवडणुकीसाठी भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी, सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार आहे, असे संकेत दिले आहेत.
मिळाल्यात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही. मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. त्याची विकेट जाईल,’ तसेच, ‘बरे झाले पक्ष फुटला. जो दोन मुले असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो. अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही,’ असे वक्तव्य करत त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली.
इतकेच नव्हे तर, “बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होेत. ही बाब मला मिळालेल्या एका माहितीतून समोर आली आहे. फोन सुरू असताना त्यांची हे गंमत पहात होते. ही खूप मोठी विकृती आहे. अवादा कंपनीला काम मिळू नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्रे दिली आहेत. पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणीही त्यांची घ्यायची, असा प्रकार आहे. हाच आकाचा तोच आका आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, “पक्षाकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्याचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही. मात्र, तो बायकोच्या आड लपतो आणि सर्व उद्योग करतो. हिंमत असेल तर, समोर येऊन लढावे ही लढाई मोठी आहे” असे रोखठोक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी या मेळाव्यामध्ये केले आहे.