काल घेतली मंत्रीपदाची शपथ आज लगेच मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त; या खासदारांनी दिली अनेक कारणं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रविवारी केंद्रामध्ये पुन्हा एकदा NDA सरकार स्थापन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह 72 नेत्यांचा शपथविधीचा सोहळा कार्यक्रम पार पडला. परंतु ही शपथ घेऊन काही तास उलटले असताच एका मंत्राने मंत्री पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुरेश गोपी (Suresh Gopi) असे या मंत्र्याचे नाव असून त्यांनी मंत्रीपद सोडण्याचे कारण देखील सांगितले आहे. ज्यात त्यांनी मी पक्षश्रेष्ठींकडे मंत्रीपद मागितलच नव्हत, असा खुलासा त्यांनी केला आहे.

मंत्रीपद सोडण्याचे सांगितले कारण..

रविवारी इतर मंत्र्यांसह केरळचे सुरेश गोपी यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु या शपथविधीचा एक दिवस उलटताच माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्रीपद सोडणार असल्याचे सांगितले आहे. सुरेश गोपी म्हणाले की, मी मंत्री पद मागितले नसताना देखील मला ते देण्यात आले आहे. आता ते मला या पदावरून मोकळं करतील, अशी आशा आहे. मी अनेक चित्रपट साईन केले असून मला ते पूर्ण करायचे आहेत. तसेच खासदार म्हणून मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे. त्यासाठी मला वेळ हवा आहे”

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी हे केरळ येथील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. या राज्यातून येणारे ते भाजपचे पहिले खासदार ठरले आहेत. त्यांनी या निवडणुकीमध्ये आयसीपीचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा 75 मतांनी पराभव केला आहे. सुरेश गोपी हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांना सिनेसृष्टीमध्ये काम करायचे आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. आता ते राजकीय क्षेत्रात देखील चोख कामगिरी करताना दिसत आहेत.