रोहित शर्माचा मोठा विक्रम ; रैनाने केलं तोंडभरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब विरुद्ध जबरदस्त खेळी करत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. रोहितने ४५ चेंडूंत ७० धावांची दमदार खेळी केली. त्याच्या जोरावर मुंबईने ४ बाद १९१ धावांची मजल मारल्यानंतर पंजाबला १४३ धावांवर रोखत मुंबईने एकतर्फी विजय मिळवला. आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

या सामन्यात रोहितने महत्त्वाचा विक्रम करताना सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या बरोबरीने स्थान मिळवले. पंजाबविरुद्ध रोहितने आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला. याआधी केवळ सुरेश रैना आणि विराट कोहली यांनीच अशी कामगिरी केली असल्याने रोहित ५ हजार धावा पूर्ण करणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला. यामुळेच रैनाने सोशल मीडियावरुन रोहितचे कौतुक केले.

रैनाने  ट्वीट केले की, ‘आणखी एक मैलाचा दगड पार करुन आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा पल्ला पार केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन माझ्या भावा. तुझा अभिमान आहे. आणखी अशीच कामगिरी करत रहा.’ यावर रोहितनेही त्याला ‘थँक्स ब्रो..’ असा रिप्लाय करत आभार मानले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like