IPL Auction : सुरेश रैना अनसोल्ड!! चेन्नईनेही नाही दाखवला रस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आयपीएल साठी लिलाव प्रक्रिया सुरू असून धक्कादायक म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला डावखुरा फलंदाज सुरेश रैना चक्क अनसोल्ड राहिला आहे. पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने रैनाला खरेदी केले नाही. त्यामुळे रैनाची कारकीर्द संपली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुरेश रैनाची बेस प्राईझ की २ कोटी होती. मात्र, त्याच्या या मुळ किंमतीवरही बोली लावण्यास कोणी रस दाखवला नाही. विशेष म्हणजे ज्या चेन्नई सुपर किंग्स कडून तो आत्तापर्यंत खेळला त्या चेन्नईने देखील रैनाला विकत घेतले नाही. रैना चेन्नईसाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. तसेच त्यांचा सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू होता.

दरम्यान, सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल असेही म्हंटल जात. रैना ने आत्तापर्यंत आयपीएल चे 205 सांमने खेळले असून त्यात 5528 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतके केली आहेत. रैना ने चेन्नई ला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

Leave a Comment