Monday, February 6, 2023

सर्व्हे : सातारा जिल्ह्यात साडेतीन लाख व्याधिग्रस्त, एकतीस लाख जणांची तपासणी पूर्ण

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत पहिला आणि दुसरा टप्पा पार पडला. त्यातील सर्व्हेमध्ये जवळपास 31 लाख लोकांची तपासणी झाली. यामध्ये साडेतीन लाख लोक व्याधीग्रस्त आढळले, काही कोरोना बाधित निष्पन्न झाले. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहीमे अंतर्गत ही तपासणी करण्यात आली. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या 36 लाखाच्या आसपास असून जिल्ह्यात 6 लाख 82 हजार कुटुंब आहेत. या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने पूर्ण नियोजन केलं होते. जिल्ह्यातील सर्व्हेमध्ये सर्व कुटुंबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न होता त्यासाठी 947 पथके कार्यरत आहेत.

मोहिमेत विविध आजार असलेले नागरिक आढळून आले. तपासणीत सर्वाधिक तीन लाख 39 हजार 139 लोक विविध व्याधिग्रस्त आढळले. यामध्ये कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजाराचे लोक आहेत. कोरोनाच्या संशयावरून ही काही जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील 98 टक्के लोकांची तपासणी पुर्ण झाली आहे