सुर्याला केलं मुरलीधरन आणि रिंकूला शेन वॉर्न; टीम इंडियाच्या विजयानंतर भन्नाट मिम्स व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये भारतीय संघाने अतिशय रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. खरं तर कमी धावसंख्या असलेल्या या सामन्यात श्रीलंकेला अखेरच्या २ षटकात अवघ्या ९ धावांची गरज होती. मात्र सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये भारताने विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ऐनवेळी सूर्या आणि रिंकूला गोलंदाजी करायला लावल्याने सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत. गंभीरने सुर्याला मुरलीधरन केलं आणि रिंकूला शेन वॉर्न केलं अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

या मॅचमध्ये भारतानं पहिली बॅटिंग करून केवळ १३७ धावा केल्या होत्या. पण श्रीलंकेला हे मामुली आव्हान देखील पूर्ण करता आलं नाही. त्यांची टीम १३७ धावांवरच अडकली. मॅच टाय झाली आणि अन् मग सुपरओव्हरमध्ये श्रीलंकेला केवळ २ धावाच करता आल्या. त्यामुळे भारतानं ही मॅच अगदी सहज जिंकली. खरं तर अखेरच्या २ ओव्हर मध्ये लंकेला ९ धावांची गरज असताना भारत हा सामना सहज हरेल असं वाटलं होतं, मात्र १९ व्या षटकात कोणाच्या ध्यानीमनी नसताना रिंकु सिंहच्या हातात चेंडू देण्यात आला. रिंकूनेही २ बळी घेत धोकादायक फलंदाज कुशल परेराला माघारी धाडलं. रिंकूने अवघ्या ३ धावा दिल्यामुळे श्रीलंकेला अखेरच्या षटकात ६ धावांची गरज होती.

सर्वाना वाटलं कि शेवटचं षटक मोहम्मद सिराज किंवा खलील अहमद टाकेल. कारण या दोन्ही गोलंदाजांची प्रत्येकी एक ओव्हर राहिली होती. मात्र कर्णधार सूर्यकुमारने सर्वाना आश्चर्यचकित करत स्वतःचा शेवटची ओव्हर टाकण्याचा निर्णय घेतला. आणि फक्त ओव्हर टाकलीच नाही तर श्रीलंकेला फक्त ५ च धावा करून दिल्या आणि हरलेला सामना टाय करण्यात यश मिळवलं. रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादव हे खरं तर फलंदाज आहेत, त्यांनी कधीच गोलंदाजी केलेली नव्हती. मात्र लंकेविरुद्ध मोक्याच्या क्षणी दोघांनीही गोलंदाजीच्या बळावर डाव पलटवला. टीम इंडियाच्या या मास्टरप्लॅन चा मास्टरमाईंड प्रशिक्षक गौतम गंभीर असल्याचे बोललं जातंय. सोशल मीडियावर सुद्धा यावरून अनेक भन्नाट मिम्स व्हायरल झालेत. एका यूजर्सने तर म्हंटल कि गंभीरने सुर्याला मुरलीधरन केलं आणि रिंकूला शेन वॉर्न केलं. एकजण म्हणाला सूर्या आणि गंभीरचा नवा इरा सुरु झालाय.