Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला मोठी ऑफर!! या संघाचा कर्णधार होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ साठी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन करता येईल आणि मेगा लिलाव होणार का याबाबत अजून तरी बीसीसीआयने कोणतीही घोषणा केली नाही. परंतु दररोज कोणत्या ना कोणत्या खेळाडूंबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. आता वर्ल्ड कप फायनल मध्ये जादुई झेल पकडणारा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबाबतीत एक चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी आयपीएल हंगामात सूर्याला कोलकाता नाईट रायडर्सने थेट कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

ट्रेड डीलमध्ये केकेआरचा खेळाडू मुंबईला जाऊ शकतो –Suryakumar Yadav

सध्या श्रेयश अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली २०२४ ची आयपीएल स्पर्धा कोलकात्याच्या संघाने जिंकली होती. मात्र तरीही केकेआरने सूर्याला कर्णधारपदाची थेट ऑफर दिल्याचे चर्चाना उधाण आलं आहे. मात्र मुंबई इंडियन्स सूर्याला सोडण्यासाठी तयार होणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे. ट्रेड डीलमध्ये केकेआरचा खेळाडू मुंबईला जाऊ शकतो किंवा केकेआर सूर्याचे पैसे मुंबईला देऊ शकतो. सूर्यकुमार यादव जर कोलकात्याच्या संघात दाखल झाला तर श्रेयश अय्यरचे कर्णधारपद धोक्यात येणार हे मात्र नक्की….

खरं तर सूर्यकुमार (Suryakumar Yadav) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) चे खास नातं सुद्धा आहे. कारण केकेआर कडूनच त्याने आयपीएल मध्ये पदार्पण केलं होते. मात्र त्यावेळी त्याला तळाला फलंदाजी करावी लागायची. सूर्या 2014 ते 2017 दरम्यान केकेआर संघात होता आणि या काळात त्याने 54 सामन्यांमध्ये 22.52 च्या सरासरीने आणि 131.89 च्या स्ट्राइक रेटने 608 धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सच्या संघात गेल्यावर सूर्याला वरच्या फळीत फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने त्याच सोन करून दाखवलं.सूर्यकुमार यादव हा ३३ वर्षाचा असून सध्या T20 इंटरनॅशनलमध्ये जगातील नंबर वन बॅट्समन आहे. एवढं नव्हे तर T20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन देखील आहे. सूर्यकुमार यादवने आयपीएल मध्ये मुंबईकडून खेळताना अनेक अश्यक्यप्राय विजय मिळवून दिलेत.

सूर्यकुमार यादवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 150 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 3594 धावा कुटल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 2 शतके आणि 24 अर्धशतके आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट १४५ राहिला आहे. सूर्यकुमार फलंदाजीला उतरताच आक्रमक फटके मारून समोरच्या गोलंदाजांवर दबाव टाकतो त्याचा फायदा संघाला होत असतो. त्यामुळे प्रत्येक संघाला सूर्या हवाहवासा वाटतो.