“रियानेच विष प्रयोग करून माझ्या मुलाची हत्या केली – सुशांतच्या वडिलांचा धक्कादायक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर रोज काही नवनवीन खुलासे होत आहेत.नुकतंच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थांसंदर्भात धक्कादायक खुलासा झाला होता. आता त्यातच सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती असा धक्कादायक आरोप केला आहे. रियानेच सुशांतची हत्या केली असून तिला आणि तिच्या साथीदारांना अटक करावी अशी मागणी सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

“मागील बऱ्याच काळापासून रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती. तिनेच त्याची हत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि रिया तसेच तिच्या साथीदारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांना शिक्षा दिली पाहिजे,” असं के. के. सिंह यांनी म्हटलं आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी रियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटवरुन तिचा ड्रग्ज डिलर्सशी संपर्क असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. सुशांत मृत्यूप्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. रियासंदर्भात नुकताच अमंली पदार्थ सेवनाबाबतचा नवा मुद्दा चौकशीदरम्यान समोर आला आहे. याबाबत ईडीने रियाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट नुकतेच सीबीआयसोबत शेअर केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’