सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर शोएब अख्तरचं भावुक ट्विट, म्हणाला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामाबाद । अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं रविवारी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येवर बॉलिवूडबरोबर क्रिकेट जगतातील व्यक्तींनीही हळहळ व्यक्त केली. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचाही समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शोएब अख्तरही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला.

”एका अत्यंत मौल्यवान व्यक्तीला आपण साऱ्यांनी गमावलं हे ऐकून खूपच वाईट वाटलं. महेंद्रसिंग धोनी चित्रपटात त्याने केलेली भूमिका मी पाहिली होती. त्याने धोनीची भूमिका हुबेहुब वठवली होती. तो खूप परिश्रम करणारा तरूण होता. फार वाईट झालं”, असं ट्विट करत शोएब अख्तरने सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

यासोबतच पाकिस्तानचचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार शोएब मलिक यानेही सुशांतला आदरांजली वाहिली. ”सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. जीवन हे खरं तर (क्रिकेटच्या एका) खूप चांगल्या डावासारखे आहे. ३४ हे काही जाण्याचे वय नाही. सुशांत, खूप लवकर गेलास. ईश्वर तुझ्या मृतात्म्यास शांती देवो”, असे ट्विट पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने केले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment