चिनी राजदूताचा इस्राईलमध्ये संशयास्पद मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्राईलमधील नवीन सरकारच्या शपथविधीच्या अवघ्या काही तास आधीच, एका चिनी राजदूताचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. चिनी राजदूत डु वेई यांचा मृतदेह हर्टझलिया येथील त्यांच्या घरात सापडला आहे.

इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची पुष्टी केली आहे. इस्त्रायली माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही घटना उघडकीस आल्यापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

लष्कराच्या रेडिओद्वारे सांगण्यात येत आहे की डु वेई या राजदूताच्या घरात हिंसाचाराची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. तपास अधिकाऱ्यांना असा संशय आहे की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेला असू शकतो.

दरम्यान, इस्राईली परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक युवल रोटेम यांनी चिनी कुलगुरू देई यूमिंग यांच्याशी बोलून त्यांना शोक संदेश पाठविला. रोटेम यांनी म्हटले आहे की इस्राईली परराष्ट्र मंत्रालय यासाठी सर्व प्रकारच्या मदतीसाठी तयार आहे. असे म्हटले जात आहे की इस्राईली मध्ये चीनचे राजदूत डू वेई बेडवरच मृत अवस्थेत आढळून आले आहेत. झोपेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

५८ वर्षीय डु वेई यांनी फेब्रुवारीमध्ये इस्रायलमध्ये चिनी राजदूत म्हणून पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते युक्रेनमध्ये चीनचे राजदूत होते. डु वे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्याचे कुटुंब इस्राएलमध्ये नव्हते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment