सोनाई पशुखाद्य कंपनीच्या मार्केटिंग एजंटचा संशयास्पद मृत्यू : पोलिसांचा तपास सुरू
सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
दहिवडी (ता. माण) येथील इंगळे मैदान परिसरात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. रामकृष्ण कुलकर्णी यांचे (वय-45, मूळ गाव रा. माळशिरस) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीजवळ दुचाकी आढळून आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रामकृष्ण कुलकर्णी हे दहिवडी येथील सोनाई पशुखाद्य या कंपनीच्या मार्केटिंग विभागात काम करत होते. रामकृष्ण या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे. अधिकचा तपास सपोनि संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस करत आहेत. घटनास्थळी रामकृष्ण कुलकर्णी याच्याजवळ सोनाई पशुखाद्य कंपनीचे आयकार्ड मिळाले आहे.