बहुचर्चित ७५ लाखांच्या घोटाळ्या प्रकरणी दोन शिक्षक निलंबित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी |गजानन घुमरे, 

परभणी महापालिकेच्या २०११ ते १५ या दरम्यान झालेल्या लेखा परीक्षणात ७५ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी दोन शिक्षकांवर पोलीसातगुन्हा दाखल आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

या प्रकरणात प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती सुभाष जोशी-कुलकर्णी आणि बालवाडी शिक्षिका तथा रोजंदारी कर्मचारी असलेल्या रेहानाबी शेख शब्बीर यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन कर्मचारी नसलेल्या लोकांच्या नावे वेतन अदा केले. त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून तब्बल ७५ लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी कारवाई देखील सुरू झाली होती. परंतु, राजकीय दबाव आल्याने हे प्रकरण बाजूला पडले. मात्र, आता काही नियमस्त अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहे. त्यामुळे उपलब्ध असलेले पुरावे आणि तत्कालीन उपायुक्त तथा लेखाधिकारी मानमोठे यांच्या लेखा परीक्षणाचा अहवाल गृहीत धरून या प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, या प्रकरणात ज्योती जोशी यांना लेखी खुलासा करण्याची संधी दिली होती.

परंतु त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे सांगत जोशी यांच्यासह रेहानाबी शेख यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली. त्यांच्या निलंबनाचे आदेश पारित करून त्यांच्यावर मनपा अधिनियम कलम 56 (2) ख प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार या दोघी आदेश अंमलात असेपर्यंत मुख्यालय सोडू शकणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे.

Leave a Comment