सस्पेन्स संपला: साताऱ्यातील दोन्ही शिवसेना आमदार बंडखोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदारांच्या बाबतचा सस्पेन्स संपला आहे. कारण दोन्ही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे. जवळपास बंडखोर 35 आमदारांचा सुरतमधील हॉटेल मधील फोटो समोर आला आहे.

सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार महेश शिंदे या दोघांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत सुरत गाठले आहे. या फोटोत पहिल्या रांगेत काळा टी शर्ट घालून आ. शंभूराज देसाई बसले आहेत तर लाल टी शर्ट घालून आ. महेश शिंदे पाठीमागील रांगेत उभे राहिले आहेत.

 

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे जवळचे आ. शंभूराज देसाई यांची ओळख आहे. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मैत्री आहे‌. आ. देसाई यांच्या मरळी येथील बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी विटा (सांगली) येथील आ. अनिल बाबर यांनीही भेट दिली. यावेळी देसाई आणि बाबर यांनी दोघांनी एकमेकांचे कौतुक केले होते. सुरत येथील हॉटेलमध्ये आ. देसाई यांच्या शेजारी आ. बाबर बसलेले आहेत.

Leave a Comment