‘या’ जिल्ह्यातील 58 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | ऐन सणासुदीच्या काळात मागण्या मान्य करूनही संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास आता एसटी महामंडळाने सुरवात केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानंतर राज्यात सर्वत्र कारवाई करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातही अचानक संपावर गेलेल्या 58 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये आटपाडी आगारातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या कर्मचाऱ्यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना घेऊन आंदोलन केले होते. कर्मचाऱ्यांच्या या निलंबनामुळे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचं विलिणीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळालाही मोठं आर्थिक नुकसान झालं.

त्यामुळे आता अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून एसटी कर्मचारी संप केला आहे. यामध्ये आटपाडी आगार अग्रेसर होता. आटपाडी आगारातील कर्मचाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना घेऊन आग्र्याला कुलूप ठोकले होते तसेच विविध प्रकारची आंदोलने केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विटा, जत, इस्लामपूर आणि शिराळा इत्यादी आगार बंद झाले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपात सांगली, मिरज आगारा सह जिल्ह्यातील सर्व आगार सहभागी झाले होते.

ऐन दिवाळीत संप करून प्रवाशांची गैरसोय करू नये अशा नोटिसा महामंडळाकडून एसटी कर्मचारी देण्यात आल्या होत्या. परंतु कर्मचारी संप केला होता. कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र त्यानंतरही कामगार संघटनांनी आदेश अमान्य असल्याची भूमिका घेत संप कायम ठेवला. त्यामुळे आता एसटी महामंडळाने आक्रमक निर्णय घेत संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment