मुंबई पूल दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुख्य अभियंता एस. ओ. कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांत कलम ३०४ ए अंतर्गत रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याचिकेवर २२ मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला . तर ३४ जण जखमी आहेत.

हिमालय पादचारी पुलाचं गेल्या वर्षीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. ऑडिटनंतरही पूल कोसळत असेल तर ही बाब गंभीर आहे. ऑडिटमध्येच दोष होता का याचीही चौकशी होईल आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

 

इतर महत्वाचे –

पुण्यात रिपाईला खिंडार ३ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षाला राम राम…

शिवसेना गोव्यात भाजपविरोधी लढणार- संजय राऊत

कोणता झेंडा घेऊ हाती? अहमदनगरच्या नगरसेवकांसमोर पेच!

Leave a Comment