चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा दाबून खून, पतीला जन्मठेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणात पतीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी गिरिधारी यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दिपक सोपान जोगदंड (34) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे, तर शिल्पा दिपक जोगदंड (21) ,असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी दिपक जोगदंड हा अटकेपासून न्यायालयाचा निकालापर्यंत कारागृहातच आहे.

याप्रकरणी मृत शिल्पा जोगदंडचा भाऊ ज्ञानेश्वर मुकुंदा गायकवाड (22), याने वाळूज एम्आयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार घटना 21 फेब्रुवारी 2017 रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास घडली. आरोपी दिपक जोगदंड हा सतत शिल्पाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या दोघांचा विवाह घटनेपासून पाच वर्षांपूर्वी झालेला होता. या दोघांना श्रावणी (वय 4) व शिवकन्या (वय 2) अशा दोन मुली आहेत. या दोन्ही मुलींना घेऊन नातेवाईक मुलाला बाहेर जाण्यास सांगितले व नंतर चारित्र्याच्या संशयावरून दिपकने शिल्पाचा गळा दाबून खून केला. फिर्यादी व आरोपी हे वाळूज एमआयडीसी भागातील वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरेनगर भागात राहत होते. काही अंतरावर दीपकचे आई-वडीलही राहत होते. दीपक मूळचा पूर्णा जि. परभणी येथील रहिवासी असून तो येथे बिगारी काम करायचा.

न्यायालयात सहायक लोक अभियोक्ता अनिल हिवराळे यांनी याप्रकरणात दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले.यामध्ये डॉक्टर, फिर्यादीची साक्ष व वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. जबाब व पुराव्याच्या आधारे न्यायालयाने दिपक जोगदंड याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Leave a Comment