पत्नीसोबत अनैतिक संबधांचा संशय : आत्महत्येस प्रवृत्त केल्याने चाैघांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशमुखनगर | पत्नी सोबत अनैतिक संबध असल्याचा संशय धरून एकास मारहाण करून आत्महत्तेस प्रवृत्त केलेबाबत बोरगाव येथील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रमेश शेडगे (वय – 22 वर्ष, रा.बोरगांव ता.सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून सोमनाथ रामचंद्र कोळेकर, रामचंद्र शंकर कोळेकर, कृष्णा रामचंद्र कोळेकर आणि अभिजित रमेश नलावडे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद समीर सुरेश शेडगे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी समीर शेडगे यांचा चुलत बंधू सागर शेडगे याने दि. 1 जून रोजी सायंकाळी 6 वा. सुमारास बोरगाव येथील शेती शाळेच्या शेजारील लिबांचे पट्टी या शिवारातील मुहीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची आकस्मात मृत्युची फिर्याद समीर शेडगे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तदनंतर गावच्या यात्रेनिमित्त गावी आलेल्या समीर शेडगे यांना मयत युवक सागर शेडगे याचे सोमनाथ कोळेकर हा त्याचे पत्नीशी याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून सोमनाथ कोळेकर वारंवार सागरला मारहाणीची धमकी देत मानसिक त्रास देत होता. तेव्हा समीर स्वतः त्याच्याशी बोल आणि असा काही प्रकार नाही हे सांग असे सागरने सांगितले होते. त्यावेळी समीर शेडगे याने सोमनाथ कोळेकर यास सांगून असा काही प्रकार नाही हे सांगितले होते. त्यांनतर समीर शेडगे हे मयत सागर शेडगे यास तु काही काळजी करू नकोस मी त्यांचेशी बोललो आहे, असे सांगून पुण्यास कामासाठी निघून गेले.

त्यानंतर समीर शेडगे हे दि. 1 जून रोजी सुट्टी काढून गावी आले असता, वडील सुरेश शेडगे यांनी सागर शेडगे हा काल पासून घरी आला नाही, तो कुठे आहे बघ, असे सांगितले. समीर शेडगे आपला चुलत बंधू आकाश शेडगे यास बरोबर घेऊन स्वतःचे लिबांचे पट्टी या शिवारात सागर शेडगे यास शोधण्यासाठी गेले होते. तेव्हा मयत सागर शेडगे याने शेताचे बांधावरील मुहीचे झाडाला पांढऱ्या रंगाचे सुती दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत समीर शेडगे यांनी तातडीने बोरगाव पोलीस ठाण्यात मयताची तक्रार दिली. बोरगाव पोलिसांनी पंचनामा करताना सागर शेडगे याचे अंगावर मारहाणीच्या खुणा दिसल्या. मृतदेहाचा पोस्टमोर्टम नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतले आणि अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर दि. 29 मे रोजी रात्री 11 वा. सुमारास वरील चौघांनीही मयताचे सोमनाथ कोळेकर याचे पत्नीशी अनैतिक संबंध असलेच्या संशयावरून सागर यास मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशी माहिती गावातील एका पाहुण्या व्यक्तीकडून मिळाली. यावरून समीर शेडगे यांनी चौघांविरोधात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास सपोनि डॉ. सागर वाघ स्वतः करत आहेत.

Leave a Comment