‘या’ जिल्हा बँकेच्या व्याजमाफी विरोधात स्वाभिमानी आक्रमक

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 175 कोटी रुपये व्याज माफी व राईटऑफ योजनेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून बँकेसमोर शनिवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. शिमग्याच्या पार्श्वभुमिवर शेतकर्‍यांना शिमगा करायला लावणार्‍या संचालक मंडळाची ऑनलाईन सभा उधळून लावू असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

दरम्यान, 100 कोटींच्या व्याज माफी योजनेत बड्या कर्जदारांचा समावेश नाही मात्र काही कारखान्याच्या कर्जाची पुर्णरचना करण्याचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी काही नेत्यांशी झालेल्या गोफणीय बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

महेश खराडे म्हणाले,”निनाई, डफले, माणगंगा, यशवंत आदि कारखान्याच्या वाहतूक यंत्रणेची कर्जे, याशिवाय वसंतदादा शाबू, प्रकाश अ‍ॅग्रो, नेरला सोया, आदिसह अन्य संस्थांची सुमारे 100 कोटींची कर्जे आणि व्याज माफ करण्याचा निर्णय येत्या 19 मार्च रोजी होणार्‍या बँकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहे ही सभा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. आता कोरॉना संपला आहे. मग ऑनलाईन सभा कशासाठी ती ऑफलाईन घ्या अन्यथा सभा उधळून लावू असा इशारा खराडे यांनी दिला.