कष्टकरी शेतकऱ्यांना टोपी घालणारे पवार-मोदी हे सारखेच; राजू शेट्टींची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती, पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरून काढावे लागणार आहे. अशात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कष्टकरी शेतकऱ्यांना टोपी घालणारे मोदी पवार हे सारखेच आहेत, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकर्याना नुकसान भरपाई, एफआरपीच्या मुद्यावरून टीपी घालण्याचे काम केले जात आहे. सरकारला साखर कारखान्यांनी ऊसाच्या पोत्यावर काढलेले कर्ज दिसत आहे. मात्र, ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? एरवी एकमेकांविरोधात बोलणाऱ्या मोदी-पवार यांच्यात एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसे झाले?

मी जरी आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो तरी आघाडी सरकारने शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधी शड्डू ठोकणारा पहिला मी असणार आहे. केंद्र सरकारकडून सध्याच्या घडीला एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला राज्य सरकारनेही संमती दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करायची म्हंटले कि मात्र केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात, असेही शेट्टी यांनी सांगितले.

Leave a Comment