कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाची यादी जाहिर होते. यामध्ये देशातील नगरपालिका , महानगरपालिकांचा समावेश असतो. यंदा नगरपालिका यादीत स्वच्छ सर्वेक्षणाबाबतीत पश्चिम भारतातील सर्वात स्वच्छ म्हणून कराड नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. नवी दिल्ली येथे हे जाहीर झालेल्या निकालात एका लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या चार हजार पेक्षा जास्त पालिकांमध्ये हा क्रमांक कराड ने पटकावला आहे. केंद्रीय आवास आणि विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात पालिकेचा गौरव करण्यात आला.
कराडला पाच हजार पैकी 4 हजार 63 गुण मिळाले. गेल्या तीन वर्षात कराड नगरपालिकेच्या विकासासाठी गट-तट विसरून सर्वजण एकत्र आले. आणि शहराचा चेहरामोहरा बदलला. कचराकुंडीविरहीत शहर अशी कराडने ओळख निर्माण केली आहे. सर्वांचे एकीच यश असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
चार हजार शहरांतुन हा क्रमांक मिलविल्या नन्तर सर्वसामान्य कराडकरांनी दरवर्षी हा बहुमान पट कविण्याचा प्रयत्न करणार आहोत अस म्हन्टल आहे. त्याच बरोबर राजेंद्र सिंह यादव ( नगरसेवक कराड), जयवंत पाटील ( उपनगराध्यक्ष ,कराड नगरपालिका ) यांनीही कराडवासीयांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
उदयनराजे भोसलें विरोधात शिवसेनेचा हा उमेदवार रिंगणार ?