बाबा स्वामींचा नेपाळचे पर्यटन सौजनशील राजदूत म्हणून सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कांतीपुर वृत्तसंस्था |नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताच्या बाबा स्वामीना नेपाळच्या २०१९-२०२० भेटीसाठी पर्यटन सौजनशील राजदूत म्हणून सन्मानित केले. या कार्यक्रमात 42 वेगवेगळ्या देशांतील 200 प्रतिनिधींनी भाग घेतला होता.

या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी स्वामीजींचे नेपाळला ध्यानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आभार मानले.त्यानंतर, नेपाळमधील भारतीय राजदूत, श्री. मंजीव सिंह पुरी यांनीदेखील स्वामींची भेट घेतली.

बाबा स्वामी हे एक भारतीय वंशाचे आध्यात्मिक गुरू व लेखक आहेत. भारत, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंग्डम आणि इतर एकूण 22 देशांमध्ये स्वतंत्रपणे चालत असलेल्या ध्यान शिबिरांच आयोजन स्वामीजी करतात.

Leave a Comment