व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रसभरीवर टीका करणाऱ्या IAS अधिकाऱ्यावर स्वरा भास्कर भडकली; म्हणाली…

मुंबई । आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत येणारी अभिनेत्री आता तिच्या रसभरी या वेबसिरीजमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ही अभिनेत्री आणखी कुणी नसून स्वरा भास्कर आहे. ‘रसभरी’ सीरिजमधील अश्लिल दृश्यांवर सातत्याने टीका होत आहे. आयएएस अधिकारी संजय दीक्षित यांनी देखील ‘रसभरी’वरुन स्वरा भास्करवर निशाणा साधला होता. त्यांच्या ट्विटवर आता स्वराने प्रत्युत्तर दिलं आहे. हा व्यक्ती खरंच IAS अधिकारी आहे का? असा प्रश्न तिने विचारला आहे.

“IMDB ने स्वरा भास्करच्या रसभरी या वेब सीरिजला सर्वात कमी रेटिंग दिलं हे योग्यच झालं. मला कळत नाही स्वरा काकी या सीरिजमध्ये शिक्षक बनून कोणतं इंग्रजी शिकवतेय.” अशा आशयाचे ट्विट संजय दीक्षित यांनी केले होते.  त्यांच्या या ट्विट ला स्वरा भास्कर ने सडेतोड उत्तर दिले आहे. तिने त्यांच्याविरुद्ध  थेट IAS असोसिएशनकडे तक्रार केली आहे.

“हा व्यक्ती खरंच IAS अधिकारी आहे का? ज्याने अनेक पुस्तकं लिहिली आहेत.” अशा आशयाचे ट्विट करुन स्वराने आपला राग जाहीर केला आहे. तिच्या या ट्विटमुळे सध्या सोशल मीडियावर ती सर्वांच्या नजरेत आली आहे. ‘रसभरी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून  मोठ्या विश्रांतीनंतर स्वरा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र यामधील पटकथा व अश्लिल दृश्यांवर अनेकांनी टीका केली आहे. IMDB वर तर १० पैकी २ रेटिंग या सीरिजला मिळाली आहे. परिणामी या सीरिजवरुन सध्या स्वराची खिल्ली उडवली जात आहे.