दिल्लीतील आपच्या विजयाबद्दल स्वरा भास्करची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वरा भास्कर अनेकदा अत्यंत काळजीपूर्वक सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करत असते. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या विजयांवर स्वरा भास्कर यांनी ट्विट केले आहे.स्वराचं हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दिल्लीमध्ये ‘आप’ने ६० हून अधिक जागा जिंकून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. अशाप्रकारे स्वरा भास्कर यांनी दिल्लीच्या या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की ती पुन्हा एकदा दिल्लीच्या प्रेमात पडली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल स्वरा भास्कर यांनी ट्विट करुन लिहिले आहे: ‘दिल्ली मेरी जान! मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडले ! अशा प्रकारे स्वरा भास्कर यांनी दिल्लीच्या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला आणि दिल्लीतील जनतेचे आभार मानले. असं असलं तरी स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे, आणि ती आपले मत अत्यंत मुक्ततेने व्यक्त करते. मग ते जेएनयूचे असो की जामियाचे स्वरा भास्कर यांनी एनआरसीपासून सीएएबद्दल जोरदार ट्विट केले आहे आणि आपली भूमिका पुढे केली आहे.

२०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाने. ६७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने केवळ ३ जागा जिंकल्या होत्या.गेल्या वेळीही कॉंग्रेसचा आकडा शून्य होता आणि यावेळीही तो शून्य झालेला दिसत आहे. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या.

 

 

Leave a Comment