आशा – दिल से ने रसिक मंत्रमुग्ध.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे |सुनिल शेवरे

सिने-संगीता च्या माध्यमातून निखळ आनंद देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पुण्यातील स्वयम संस्थे तर्फे नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध संकल्पनां वर आधारित गाण्यांचे सादरीकरण हे स्वयम चे वैशिष्ठ्य आहे. आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका आशा भोसले यांनी नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण केले. आशाताईंच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून स्वयम ने एस. एम. जोशी फाऊंडेशन च्या सभागृहात “आशा -दिल से” या नावाने ‘आशा भोसले महोत्सव’ आयोजित केला होता.’ या मध्ये विविध ‘मुड्स’ दर्शवणाऱ्या तब्बल ८६ गाण्यांचा समावेश केला गेला होता. रफी, किशोर कुमार आणि इतर गायक-गायिकांबरोबर गायलेली लोकप्रिय तसेच पुरस्कारप्राप्त गाण्यांबरोबरच काही मराठी आणि आशाताईंनी गायलेल्या बंगाली आणि इंग्रजी भाषिक गाण्याचा समावेश होता. आशा भोसले यांची सोलो पस्तीस गाणी पुण्याच्या मृदुल निक्ते यांनी या तीन दिवसीय महोत्सवात सादर केली. विवेक पांडे, संयोगिता बदरायणी, उमेश पेडगावकर, रमेश कानडे, अभिजात भिडे, नरेंद्र डोळे, विवेक दाभाडकर आणि अनुपम बॅनर्जी यांनी सह गायन केले. उपस्थित रसिकांना समर्पित केलेल्या गुलजार लिखित मेरा कुछ सामान… या गाण्याला रसिकांची वाहवा मिळाली. कार्यक्रमाचे निवेदन शीतल कापशीकर, डॉ. बीना शहा आणि सतीश सेखरी यांनी केले.

स्वयम् च्या प्रत्येक कार्यक्रमास मनोरंजना सोबत सामाजिक बांधिलकीची जोड असतेच. डॉ. अभिजीत सोनवणे हे गेली काही वर्षे पुण्यातील विविध भागातील भिक्षेकरींवर मोफत औषधोपचार करीत असून त्यांना भीक मागण्या पासून परावृत्त करण्याचे कार्य करतात. त्यांच्या सोहम ट्रस्ट साठी स्वयम ने या महोत्सवाच्या स्थळी दानपेटी ठेवून महोत्सवास आलेल्या रसिक प्रेक्षकांना ऐच्छिक दाना विषयी आवाहन केले होते. या दानपेटी मध्ये जमा झालेल्या निधी मध्ये स्वयम तर्फे काही निधी ची भर घालून महोत्सवाच्या समारोपा दरम्यान हा निधी डॉ. अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा सोनवणे यांना सुपूर्त करण्यात आला. महोत्सवाचे आयोजन कर्नल विवेक निक्ते (निवृत्त) यांनी आणि संयोजन सरिता सिधये यांनी केले होते.

Leave a Comment