खाऊगल्ली | स्वीट कॉर्न सूप हे एक लोकप्रिय सूप आहे. जे की पौष्टीक आणि रुचकर असते. ते बनवायलाही सोपे आहे आणि झटपट होते. जर आपल्याला काही हलकंफुलकं खवास वाटत असेल तर स्वीट कॉर्न सूप हा पर्याय उत्तम ठरू शकतो. जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणूनही हे सूप आपण वापरू शकतो. चला तर मग असे रुचकर, झटपट सूप आपण घरी कसे बनवायचे हे पाहुयात.
साहित्य –
१) २ कप स्वीट कॉर्नचे दाणे (कच्चे)
२) १ टीस्पून बटर
३) २ ते ३ टेस्पून गाजर, मध्यम चिरून
४) २ टेस्पून कोबी, चिरून
५) १ टेस्पून कॉर्न फ्लोअर
६) चवीपुरते मीठ
७) २ टीस्पून साखर
८) मिरपूड
कृती –
स्वीट कॉर्न प्रेशर कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून शिजवून घ्या.२ पैकी दीड कप स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. बारीक भोकाच्या चाळणीवर गाळून घ्या.
कढई गरम करून त्यात बटर घालावे. गाजर, कोबी घालून मिनिटभर परतावे. आता गळलेली प्युरी आणि उरलेले १/२ कप अख्खे दाणे घालावे. तसेच साधारण अडीच कप पाणी घाला.
लहान वाटीत कॉर्न फ्लोअर आणि १/२ कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. सूपला उकळी आली की त्यात दाटसरपणासाठी कॉर्न फ्लोअरचे मिश्रण घालावे.
मीठ, साखर आणि मिरपूड घालावी. मध्यम आचेवर मिनिटभर उकळी काढावी.
सूप सर्व्हिंग बोलमध्ये वाढावे. गरमच सर्व्ह करावे.
( टीप – भाज्या ऐच्छिक आहेत. पण नुसते स्वीट कॉर्न सूपऐवजी भाज्या चांगल्या लागतात. )
इतर महत्वाचे –