कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत पुणे- बंगळोर या महामार्गावर बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर आणि चारचाकीच्या अपघातात तीनजण जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना चारचाकी चालकाचा ताबा सुटल्याने पाठीमागील बाजूस धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, पुणे- बेंगलोर महामार्गावर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. अपघातात चालक योगेश अशोक बारटक्के (वय- 55), भारती अशोक बारटक्के (वय- 55) नीरज अशोक बारटक्के (वय- 5, सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा) हे जखमी झाले आहेत. जखमींना हायवे हेल्पलाईन यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय कराड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे
अपघातात चारचाकी स्विफ्ट गाडी क्रमांक (एमएच- 12 ईटी- 3437) आणि ट्रक्टर क्रमांक (एमएच -11 यू- 823) या दोन वाहनांचा अपघात झाला आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावर ट्रॅफिक जाम झाल्याचे पाहायला मिळाले, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे. अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झालेले आहे. हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, रमेश खुणे, सिकंदर उघडे, कराड शहरचे पोलिस प्रशांत जाधव यांनी मदत कार्य केले.