पाटण-कोयना मार्गावरील अपघातात स्विफ्टचा चक्काचूर, 3 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | पाटण-कोयनानगर मार्गावरील एमआयडीसी नजीक भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीवर जावून आदळली. यात गाडीतील 3 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून ही गाडी पाटण पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. दरम्यान या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण-कोयनानगर मार्गावरील पाटणपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या येराड गावच्या हद्दीत रविवारी दि. 28 रोजी रात्रीच्या सुमारास एमआयडीसीनजीक भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार थेट रस्त्याकडेला इलेक्ट्रीक डीपीवर जावून आदळली. या अपघातात गाडीतील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. नशीब बलवत्तर म्हणून जीवीतहानी झाली आहे. दरम्यान अपघातग्रस्त गाडी ही पाटण पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची असल्याची चर्चा घटनास्थळी होती. यात सदर पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याचे समजते आहे.

या अपघाताची नोंद सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत झाली नव्हती. याबाबत पाटण पोलिसांशी संपर्क साधला असता अपघाताची नोंद पोलिसात झाली नसल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Comment