स्वित्झर्लंडने आल्प्स पर्वतावर चमकवला तिरंगा, कोरोना विषाणूशी भारताच्या लढ्याला केला सलाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिनिव्हा । भारतासह जगभरातील देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा कहर सुरूच आहे. प्रत्येक देश या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक पावले उचलत आहेत. जगातील अनेक देशांनी कोरोना संकटाला सामोरे जाण्याच्या भारत सरकारच्या उपायांचे कौतुक केले आहे. दरम्यान, स्विस आल्प्सच्या मॅटरहॉर्न पर्वतावर लाईटच्या मदतीने भारतीय तिरंग्याचे चित्रण केले आहे. याद्वारे आशा आणि उत्कटतेचा संदेश कोरोना महामारीतून जिंकण्यासाठी देण्यात आला आहे.

प्रख्यात स्विस लाइट आर्टिस्ट गेरी हॉफस्टेटर यांनी 14,690 फूट पर्वताला तिरंग्याच्या आकारात प्रकाशित केले आहे. भारतीय परराष्ट्र सेवेच्या अधिकारी गुरलीन कौरने त्यांच्या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर करताना लिहिले कि, ‘सुमारे 800 मीटर उंचीवर तिरंगा. आल्प्सची हिमालयाशी मैत्री. धन्यवाद!’

24 मार्चपासून या पर्वतावर, कोरोना महामारीविरोधात जगाची एकजूट दाखवण्यासाठी, दररोज वेगवेगळ्या देशांचे झेंडे दाखवणाऱ्या लाईट्स प्रकाशित केल्या जात आहेत. बुधवारी, हा पर्वत स्वित्झर्लंड, अमेरिका, युनायटेड किंग्डम, इटली आणि टिसिनोच्या स्विस प्रदेशाचे ध्वज प्रतिबिंबित करणार्‍या लाइट्सनी उजळला होता.

लाइट आर्टिस्ट गेरी हॉफस्टेटर स्पष्ट करतात, ‘प्रकाश म्हणजे आशा. अशा वेळी जेव्हा जग कोरोनासारख्या संकटाचा सामना करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी हे केले गेले आहे, ज्याद्वारे हा संदेश जाईल की, संपूर्ण जग एकजुटीने या महामारीशी लढत आहे आणि आम्ही या लढ्यात यशस्वी होऊ.’

स्वित्झर्लंडमध्ये आतापर्यंत 18,000 हून अधिक लोकांना COVID-19 ची लागण झाली आहे. 430 लोकांनी आपला जीवही गमावला आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने शाळा, बार, रेस्टॉरंट्स आणि अनावश्यक वस्तूंची दुकाने बंद केली आहेत, जेणेकरून सोशल डिस्टसिंगचे पालन करता येईल.

त्याच वेळी, जगाबद्दल बोलताना, शुक्रवारी कोरोनाची 86,198 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 22,48,500 पेक्षा जास्त झाली आहे. कालचा दिवस देखील कोरोनामुळे मृत्यूच्या दृष्टीने वाईट असल्याचे सिद्ध झाले आणि जगभरात 7382 लोकांनी आपले प्राण गमावले.

Leave a Comment