तडीपार गुंडांचा राडा : जुळेवाडीत नशा करण्याच्या वादातून तलवारीने हल्ला, तिघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील जुळेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक नशा करण्यावरून झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील एकासह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच अन्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. सागर करडे (रा. जुळेवाडी, ता. कराड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर अभिनंदन झेंडे व अन्य दोघेजण (नावे समजू शकली नाहीत) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिनंदन झेंडे याला पोलिसांनी हद्दपार केला होता. शुक्रवारी रात्री अभिनंदन झेंडे व रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर करडे हा जुळेवाडी येथे नशा करत होते. नशेत असताना अभिनंदन झेंडे व सागर करडे याच्यांत नशा करण्यावरून वाद झाला. त्यावेळी सागर करडे याने अभिनंदन झेंडे याला मारहाण केली. मारहाण केल्याचा राग मनात धरून शनिवारी सकाळी अभिनंदन झेंडे त्याच्या साथीदारासह तलवारी सारखे हत्यारे घेऊन जुळेवाडी येथे जावून सागर करडे याच्या डोक्यात तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी करून पलायन केले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर व त्यांचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर करीत आहेत.

वेषांतर करून पोलिसांची जंगलात शोधमोहीम

जुळेवाडी येथे सागर करडे याच्यावर वार करून अभिनंद झेंडे व त्याचे साथीदार किल्ले मच्छिंद्रगडच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातील एका आश्रमात जावून लपून बसले होते. पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांनी शेतमजूराचा वेश परिधान करून जंगलात शोध मोहिम राबवत असताना आपल्या कर्मचार्‍यासह सापळा रचून अभिनंदन झेंडेसह तिघांना ताब्यात घेतले.

Leave a Comment