तलवार खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 36 तलवारी, 6 कुकरी, 2 गुप्तीसह एकूण 49 धारदार शस्त्र जप्त

0
106
sword
sword
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शनिवारी पुंडलिकनगर पोलिसांनी सेव्हन हिल येथे सापळा रचून ब्लू डार्ट कुरिअर सेवा देणारा छोटा हत्तीसह (एमएच 20 ईजी 1107) त्यातील पाच तलवारी जप्त केल्या होत्या. याप्रकरणी इंदिरानगर बाजीपुरा येथील दानिश खान याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते.

त्यानंतर रविवारी जिन्सी व पुंडलीकनगर पोलीस ठाण्याने संयुक्त कार्यवाही ऑनलाईन तलवार खरेदी करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी इरफान खान ऊर्फ दानिश खान व अय्युब खान (रा. हमजा मस्जीतजवळ जुना बायजीपुरा औरंगाबाद) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून जिन्सी पोलिसांनी रविवारी 41 तलवारी जप्त केल्या आहेत. यामध्ये 6 कुकरी 2 गुप्ती आणि 36 तलवारी असे एकूण 49 धारदार शस्त्र पोलीसांनी जप्त केले आहेत. तसेच औरंगाबाद शहरात हे आरोपी इतरही ठिकाणी तलावर विक्री करत असल्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, पोलीस उपआयुक्त दिपक गि-हे यांनी सर्व नागरिकांस आव्हान केले आहे की, कुणाकडेही धारदार शस्त्र केल्या असेल तर त्यांनी जिन्सी पोलीस ठाणे येथे जमा करावे. तसेच सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 06 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगीरी डॉ. निखील गुप्ता साहेब, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर, पोलीस उपआयुक्त डॉ दिपक गि-हे साहेब, निशीकांत भुजबळ सहायक पोलीस आयुक्त साहेब सिडको विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, स.पो.नि. सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर, शेख सरवर, दत्ता शेळके विशेष शाखा, सफी अय्युब पठाण, संपत राठोड, हारुण शेख, भाऊसाहेब जगताप, गणी शेख, बाळु थोरात, पोलीस शिपाई सुनील जाधव, संजय गावंडे, इरफान खान सिडको पोलीस ठाणे, तसेच पुडंलीक नगर पोलीस स्टेशनचे बाळाराम चौरे, अजय कांबळे, दिपक जाधव, मान्टे. प्रविण गुळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here