Symbiosexual | जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात असतात. तेव्हा आपसूकच त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक ओढ निर्माण होते. आता जर आपण प्रत्येकाला विचारले, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त काय महत्त्वाचे असते? तर प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरे येतील. कारण या जगामध्ये वेगवेगळ्या विचारांची लोक राहतात. आपण अनेक जोडपी असे पाहिले आहेत. काही होमोसेक्सअल असतात काही बायसेक्शुल असतात. काही लोकांना स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये देखील जास्त इंटरेस्ट असतो. परंतु अलीकडे एक सिम्बियो सेक्सुअलिटी (Symbiosexual) हा प्रकार समोर आलेला आहे. म्हणजे यामध्ये एक व्यक्ती आधीच रिलेशनशिप मध्ये असलेल्या दोन व्यक्तींना डेट करते. आता हे प्रकरण नक्की काय आहे आपण जाणून घेऊया.
सिम्बियो सेक्सुअलिटी म्हणजे काय ? |Symbiosexual
आतापर्यंत आपण लेसबियन, गे ट्रान्सजेंडर यांसारखे प्रकार ऐकलेले आहेत. परंतु आता नवीनच हे सिम्बियो सेक्सुअलिटी नाव समोर येत आहे. यानुसार एक व्यक्ती एका जोडप्याकडे आकर्षित होत असते. जे आधीपासूनच एकमेकांच्या नातेसंबंधात आहे. मानवाची ही एक नवीन आवड आहे आणि काही लोकांमध्ये ती दिसून देखील आलेली आहे. याबाबत एक संशोधन देखील झालेले आहे. जे लोक अशा जोडप्याच्या नात्यात येतात. त्यांना त्यांच्या केवळ शारीरिक गरज पूर्ण करायची असते. त्यांना इतर कोणत्याही लोकांशी जवळीक वाटत नाही.
संशोधनात काय समोर आले
अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे संशोधन केले आहे. यावरून एक नवीन लैंगिकता समोर आलेली आहे. ज्या व्यक्तीला आपण सिम्बियो सेक्सुअलिटी असल्याचे माहित आहे. त्यांना इतर दोन व्यक्तींमध्ये राहायला आवडते. ते त्यांच्यातील प्रेम देखील वाढवतात. आणि स्वतः देखील शारीरिक दृष्टीने त्यांच्यामध्ये समावेश होतात. त्या व्यक्तीला या आधीच दोन प्रेम करणारे लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते.
या संशोधनात विविध विषयांवर प्रश्नांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या अभ्यासामध्ये 373 पैकी 145 सहभागी असलेल्या लोकांनी या प्रकारच्या आकर्षणाला संमती दर्शवलेली आहे. समलैंगिक 90 पेक्षा जास्त झालेले आहे. या संशोधनात ज्यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. ते लोक बहुतेक मध्यमवर्गीय आणि चांगले शिक्षण घेतले आहेत. त्यामुळे आता हा एक नवीन प्रकार उदयास आलेला आहे. या भावना अगदी नैसर्गिक असतात त्यामुळे त्या कोणत्याही गैर मानल्या जात नाहीत.