Symptoms Of Kidney failure | आपल्या शरीरातील प्रत्येक भाग खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक भागाचे एक वेगळे आणि महत्त्वाचे असे काम आहे ल. परंतु त्यातील किडनी हा खूप महत्त्वाचा असा अवयव आहे. किडनीच्या माध्यमातून आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे रक्त फिल्टर केले जाते. त्यामुळे किडनीचे (Symptoms Of Kidney failure) आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे मूत्रपिंडाविषयी कोणतीही समस्या असेल, तर ती समस्या ओळखणे आणि त्यावर लवकरात लवकर उपचार घेणे खूप महत्त्वाचे असते. अन्यथा यामुळे तुमच्या किडन्या खराब होऊ शकतात. जर तुमच्या किडन्यांविषयी कोणतीही समस्या असेल तर तुम्हाला काही लक्षणे ही सकाळी दिसतात. जर ही लक्षणे दिसत असेल तर तुम्ही वेळीच उपचार घेणे खूप गरजेचे आहे..
थकवा आणि अशक्तपणा | Symptoms Of Kidney failure
तुम्ही जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर हे किडनी संबंधित एक अत्यंत गंभीर लक्षण आहे. जर तुमची किडनी योग्य रीतीने काम करत नसेल, तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ हे शरीराबाहेर योग्यरित्या टाकले जात नाही. ते विषारी पदार्थ शरीरात जमा होतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवतो.
लघवीचा रंग
दररोज सकाळचा लघवीचा रंग आणि प्रमाण हे किडनीच्या आरोग्य बद्दल योग्य माहिती देत असतात. जर तुमची लघवी खूप पिवळी तसेच आसामान्य रंगाची असेल, तर तुम्हाला वारंवार लघवी करण्याची गरज आहे. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे देखील हे लक्षण दिसू शकते.
पोटात दुखणे
तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर तुमचा पाय, पोटात सूज असेल किंवा क्रॅम्स जाणवत असतील, हे देखील तुमचे मूत्रपिंड योग्यरीत्या काम करत नसल्याचे एक लक्षण आहे.
तहान लागणे
तुम्ही जर सकाळी उठल्यावर तुम्हाला सारखी सारखी तहान लागत असेल, हे देखील किती खराब होण्याचे एक लक्षण आहे. किडनीच्या समस्यांमुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे सारखी तहान लागते. तसेच जर तुमच्या त्वचेला देखील सारखी खाज सुटत असेल, तरी देखील हे किडनी खराब होण्याचे लक्षण आहे. तुमच्या शेतात जर विषारी पदार्थ जास्त प्रमाणात जमा झाले, तर तुमच्या त्वचेला खाज सुटते. पुरळ येतात. यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. अशा समस्या जर तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर आणि संपर्क साधून योग्य उपचार घ्या.