जनसहभागातूनच टी. बी. मुक्त भारताकडे वाटचाल शक्य – सुहास वारके

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कोल्हापुरात कार्यक्रम 

कोल्हापूर प्रतिनिधी

टी. बी. वर मात करणे गरजेचे आहे. सर्वात जास्त टी. बी. चे प्रमाण मुंबई मध्ये आहे. टी. बी. माणूस विजय मिळवू शकतो. जनसहभागातूनच टी. बी. मुक्त भारताकडे वाटचाल शक्य आहे, असे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके म्हणाले.  जिल्हा क्षयरोग केंद्र आयोजित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात मंगळवारी शाहू स्मारक भवन येथे ते बोलत होते.

जिल्हा क्षयरोग केंद्राच्या प्रमुख जिल्हा क्षयरोग आधिकारी उषा कुंभार म्हणाल्या, क्षयरोग पुर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी उपचाराची गरज आहे. शासकीय रूग्णालयात मोफत उपचार केले जातात. तसेच पोषण आहारासाठी रूग्णांना ५०० रूपये अनुदान देण्यात येते. आज जिल्ह्यात २१३३ रुग्णांची नोंद शासकीय रूग्णालयात आहे. त्यांंचावर उपचार सुरू असून आपली वाटचाल क्षयरोगमुक्त जिल्हा लवकरच करूअसं आरोग्य अधिकारी म्हणाले.

२४ मार्च रोजीच्या जागतिक क्षयरोग दिनाचे ब्रीद वाक्य हे  “हीच वेळ आहे… क्षयरोग निर्मुलनाची” असं आहे. क्षयरोग निर्मुलनात उल्लेखनीय काम करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि गगनबावडा तालुके क्षयमुक्त ठरले आहेत. यावेळी डॉ. पी.पी धारूरकर, एस. एस. पुजारी, डॉ. मडके, डॉ. अनिता सैबन्नावर,डॉ. डी.एस. आंबोळी, डॉ. कवठेकर, डॉ. चोकाककर, डॉ. चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Comment