हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट आधी टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाला होता. तो पुढील दोन्ही सामने खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले होते. तेव्हा पासून यादवच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची चर्चा सुरू होती. जलद गोलंदाजी म्हणून टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर या दोघांचे नाव आघाडीवर होते.अखेर उमेश यादवच्या जागी टी. नटराजनचा (T. Natarajan) उर्वरित दोन टेस्टसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. BCCI नं त्यांच्या ट्विटर हँडलवर ही घोषणा केली आहे.
NEWS: T Natarajan to replace Umesh Yadav in India’s Test squad. #TeamIndia #AUSvIND
Details 👉 https://t.co/JeZLOQaER3 pic.twitter.com/G9oXK5MQUE
— BCCI (@BCCI) January 1, 2021
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये नटराजन याने दिमाखदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्य वनडे सीरिजमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये नटराजन याने 70 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये नटराजनला 6 विकेट मिळाल्या.
दरम्यान, भारताने दुसरा कसोटी सामना जिंकून 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’