T20 World Cup 2024 : सर्वात मोठी भविष्यवाणी!! हा संघ जिंकणार यंदाचा T20 World Cup

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या १ जून पासून यंदाची T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. जवळपास सर्वच देशाने आपला संघ जाहीर केला असून यावर्षी कोण वर्ल्डकप जिंकणार याबाबत अनेक तर्क -वितर्क लढवले जात आहेत. सर्वच संघ तुल्यबळ वाटतं असून कोण विजेता होईल हे सांगणं तस कठीणच काम आहे. मात्र वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सने मोठी भविष्यवाणी करत यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेतील चॅम्पियन संघाचे नाव सांगून टाकलं आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या मते वेस्ट इंडिजचा संघ टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो.

सर व्हिव्ह रिचर्ड्स म्हणाले, “माझं पाकिस्तानवर प्रेम असलं तरी, मला वाटतं की वेस्ट इंडिजकडे इतका चांगला संघ आहे की तो यावेळी विजेतेपद (T20 World Cup 2024) मिळवू शकतो. यंदाच्या वर्ल्डकप मध्ये वेस्ट इंडिज चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली . वेस्ट इंडिज संघ प्रतिभावान असून जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद त्यांच्यात आहे. या T20 फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजचे सर्वच खेळाडू उत्तम फॉर्म मध्ये आहेत, फक्त त्यांनी आपला सर्वश्रेष्ठ खेळ करून दाखवला पाहिजे असे व्हिव्ह रिचर्ड्स यांनी म्हंटल.

आत्तापर्यंत वेस्ट इंडिजने २ वेळा T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. आक्रमक खेळाडूंचा भरणा असलेला वेस्ट इंडिजचा संघ T20 क्रिकेट मध्ये सर्वानाच जड जातो हा इतिहास आहे. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोवमन पॉवेल वेस्ट इंडिजचे कर्णधारपद भूषवणार आहे. आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायरसारख्या अनुभवी खेळाडूलाही संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ चांगलाच मजबूत वाटतं आहे.

T20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघ- रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड

T20 विश्वचषक 2024 गट: T20 World Cup 2024

अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

D गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ