T20 World Cup 2026 Team India Squad : भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संयुक्तपणे संघाची घोषणा केली. फेब्रुवारी–मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंका येथे हि स्पर्धा खेळवली जाणार आहे. संघात तीन बदल करण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला या T20 वर्ल्डकपसाठी स्थान मिळालेलं नाही. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्हीमध्ये अक्षरने मागील काही वर्षांपासून दमदार कामगिरी केली आहे. संघात अनुभव आणि युवा जोश यांची योग्य सांगड घालण्यात आली आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून अंतिम सामना 20 मार्च रोजी होणार आहे. मागील वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला लोळवून विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली इतिहासाची पुनरावृत्ती होते का ते बघावं लागेल. T20 World Cup 2026 Team India Squad
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2026 announced 🚨
— BCCI (@BCCI) December 20, 2025
Let's cheer for the defending champions 💪#TeamIndia | #MenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/7CpjGh60vk
टी-20 विश्वचषक 2026 साठी कोणाकोणाची निवड T20 World Cup 2026 Team India Squad
फलंदाज – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
यष्टीरक्षक – इशान किशन, संजू सॅमसन.
अष्टपैलू खेळाडू – अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे.
फिरकीपटू – वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
वेगवान गोलंदाज – जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाचे सामने
7 फेब्रुवारी 2026: भारत vs युएसए, मुंबई
12 फेब्रुवारी 2026: भारत vs नामीबिया, दिल्ली
15 फेब्रुवारी 2026: भारत vs पाकिस्तान, प्रेमदासा, कोलंबो
18 फेब्रुवारी 2026: भारत vs नेदरलँड्स,अहमदाबाद




