हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 T20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाले असून 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. ही विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे कट्टर विरोधक पुन्हा एकदा एकाच ग्रुप मध्ये आहेत.
ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. बाकी राहिलेले 4 संघ हे फर्स्ट राउंड च्या निकालातून ठरतील.
The fixtures for the ICC Men’s #T20WorldCup 2022 are here!
All the big time match-ups and how to register for tickets 👇
— ICC (@ICC) January 20, 2022
दरम्यान, मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांसमोर असतील. याआधी टी 20 विश्वचषकात भारत पाकिस्तान 2021मध्ये भिडले होते. त्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.