मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिने सिनेमात साकारलेल्या उत्तम भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तीच सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलीवूडमध्ये तिनं आपलं स्थान सेलिब्रिटी स्टार पेक्षा एक उत्तम अभिनेत्री म्हणून मजबूत केलं आहे. अशा वेळी तापसी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. तापसीच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली असून हा व्यक्ती एक प्रसिद्ध खेळाडू आहे. तापसीनं नुकताच तिच्या रिलेशनशीप विषयी खुलासा केला आहे.
प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ‘मॅथियस बो’ याला डेट करत असल्याचा खुलासा खुद्द तापसीनं एका खासगी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ‘एक अभिनेत्री म्हणून केवळ चर्चेत राहण्यासाठी मी हे सांगत नाहीए. मला कोणापासूनही काहीच लपवायचं नाही आहे. माझ्या आयुष्यात मॅथियस खास व्यक्ती आहे याचा मला फार आनंद आहे’, अशी भावना तिनं व्यक्त केली आहे.
‘माझ्या घरच्यांना देखील आमच्या नात्याबद्दल कल्पना आहे. फक्त मला तो आवडला हे महत्त्वाचं नाहीए. माझ्या आई-वडिलांना आणि आवडायला हवा. त्यांनी आमचं नातं स्विकारलं आहे, याचा अर्थ त्यांनाही तो आवडतोय. आई-वडिलांनी नको म्हटलं असतं तर मला वाटत नाही की आमचं नातं इथपर्यंत पोहोचू शकलं असतं’, असंही तापसीनं म्हटलं आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”