सातारा शहर पोलिसांकडून तडीपार गुंडास अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर असलेल्या सदर बझार येथील सुश्रीत तानाजी सावंत या तडीपार गुन्हेगारास सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा यासारख्या गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने त्यास पोलिस अधीक्षकांनी एक वर्षाकरिता सातारा जिल्ह्यातून तडीपार केले होते. आदेशाचे उल्लघंन केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज पहाटे पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत सुश्रीत सावंत हा सदर बाझार परिसरात असल्याची माहिती मिळाली. सातारा शहरच्या डीबी पथकाने परिसरामध्ये शोध मोहीम राबवून तडीपार असलेल्या सुश्रीत सावंत यास अटक केली. त्याच्यावर तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे,  सहा. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निवाळकर, सपोनि चंदना श्रीसुंदर याचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, साबळे, पो.ना. विक्रम माने, पो.कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोग. सागर गायकवाड यांनी केलेली आहे.