साताऱ्यात तलवारीने दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सदर बझार परिसरामध्ये तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. विपुल तानाजी नलवडे (वय- 20, करंजे) याला सातारा शहरांमधून तडीपार करण्यात आले होते.

दि. 25 जून रोजी नलवडे त्याचा मित्र सतीश पवार यांच्यासह सदर बाजार येथे लोकांना घरगुती कारणासाठी दमबाजी करण्यासाठी आला होता. सदर ठिकाणी त्याच्या हातामध्ये तलवार घेऊन त्याने लोकवस्तीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो त्याच्या मित्रासह माघारी पळून गेला.

या प्रकरणाची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाली असता त्यांनी या पथकाला तत्काळ पाचारण केले. या पथकाने नलवडे याला शस्त्रांसह तात्काळ अटक केली. यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात सात गुन्हे सातारा तालुका पोलीस ठाण्यात एक आणि सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, विक्रम माने, संतोष कचरे, गणेश भोंग, सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Comment