मोदींच्या ५ एप्रिलच्या आवाहनावर भाष्य करत रोहित पवारांनी केले ‘हे’ नवे आवाहान

अहमदनगर प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज सकाळी देशाला उद्देशून एक व्हिडिओ मेसेज सोशल मिडियावर प्रसारित केला. याद्वारे पंतप्रधान मोदींनी नागरिकांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जातात दिवे घेऊन घराच्या बाहेर जमायला सांगितले. मोदींच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर भाष्य करत नागरिकांना आणखी एक आवाहन केले आहे. … Read more

अहमदनगरमध्ये कोरोनाचे आणखी ६ रुग्ण, एकुन कोरोनाबाधितांची संख्या १४ वर

अहमदनगर प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३४२ वर पोहोचली असून आता अहमदनगर मध्ये आणखी ६ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अहमदनगर मधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे. आज जिल्ह्यातील ५१ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यातील ६ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आले आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यासाठी ही धोक्याची … Read more

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या १५३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात असल्याचे समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच राज्यातील महानगरपालिका निहाय कोरोना रुग्णांची माहिती दिली. राज्यात पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीच्यानुसार पिंपरीचिंचवडमध्ये … Read more

शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का ? – सत्यजित तांबे

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश गिरे पाटील असे मृताचे नाव आहे. यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी … Read more

नगरमध्ये शिवसेनेने केलं वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन

अहमदनगर प्रतिनिधी । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्येएका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहेत. आज अहमदनगमध्ये वारीस … Read more

चांगली कामे करुन घेण्यात मी बाॅस – रोहित पवार

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी जामखेड मधील हळगाव येथील जनतेशी संवाद साधला. ‘मतदारसंघात विकास कामे चांगली होत नसतील तर तत्काळ मला कळवा. चांगले कामे करून घेण्यासाठीचा मी बॉस आहे. जो चांगली कामे करणार नाही त्याचा योग्य बंदोबस्त केला जाईल, असे आमदार रोहित पवार म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात … Read more

अबब!!! साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान

अहमदनगर । शिर्डीच्या साई चरणी २०१९ मध्ये तब्बल २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले आहे. ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून सदर देणग्या देण्यात आलेत. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षापेक्षा २०१९ या वर्षात यंदा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये दक्षिणा पेटीत १५६ कोटी ४९ लाख … Read more

अशा आरोपींना जर फाशी होत नसेल तर एन्काउंटरच योग्य – अण्णा हजारे

अहमदनगर प्रतिनिधी | देशातील महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनांत सतत वाढ होत आहे. त्यांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालूनही आरोपींना फाशीची शिक्षा होत नसेल तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थनही केले. व्हेटरनरी डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले … Read more

पर्यटन विशेष : अहमदनगर शहर आजही देते इतिहासाची साक्ष , पर्यटन विकास मात्र कागदावरच

अहमदनगर हे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे . अहमदनगरचे नाव अहमद निजाम शाह प्रथम यांचे आहे, ज्याने १४९४ मध्ये या शहराची स्थापना बहामनी सैन्याविरूद्ध लढाई जिंकली अशा रणांगणाच्या जागेवर केली. बहमनी सल्तनत फुटल्यानंतर अहमदने अहमदनगरमध्ये नवीन सल्तनत स्थापन केली, ज्याला निजाम शाही राजवंश म्हणून ओळखले जाते.

कांद्याचे भाव गगनाला; कांदा १३ हजार प्रति किंटल पार

गेल्या दोन महिन्यांपासून आवक मंदावल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव इथं सोमवारी कांद्याला १३ हजार रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.