अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने गाठणार ४५ हजाराचा टप्पा
अमेरिका आणि इराणमधील युध्दजन्य संकेतांमुळे सर्वात मोठा परिणाम शेअर बाजार आणि सोनेदरावर झाला आहे. युध्दाच्या भीतीने गुंतवणुकीची सुरक्षितता तपासली जाते आहे आणि साहजिकच सोने हा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पहिली पसंती सोने खरेदीला दिली असल्याने आज ४१,००० पार करणारा सोनेदर यापुढेही चढता आलेखच ठेवणार असून तो ४५,००० पर्यंत पोहोचणार आहे.