हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली !’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आता दिसत आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दगडाला पाझर फुटेल पण अजित पवारांचं रडणं ही काय भानगड? उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

अहमदनगर प्रतिनिधी । ‘दगडाला पाझर फुटतो हे ऐकलं होतं पण अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू येतात हे पहिल्यांदाच समजलं’ अशी शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली. शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे अहमदनगर येथे आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली. १५ वर्ष सत्तेत असताना … Read more

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सांगली, मिरज विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे मागील काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुका आठवडा भरात जाहीर होणार असून सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ या विधानसभेच्या जागा सेनेला मिळाव्या म्हणून जिल्हा शिवसेना संघटन आग्रह धरत आहेत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी आमदार सेनेच्या संपर्कात असून … Read more

कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत त्यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते. भास्कर जाधव यांच्या ‘घरवापसी’ने त्यांच्या … Read more

शिवसेनेकडून जिल्ह्यातील आठ विधानसभेसाठी मुलाखती

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश सुरु आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली असताना जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत पार पडल्या. मात्र या मुलाखतीसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त मुंबईतील शिवसेना भवनमध्ये समन्वयक विश्वनाथ नेरुळकर, खा. … Read more

अमित शहा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार…

Untitled design

मुंबई | गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे लोकसभा निवडणुक लढणार आहेत. अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे यांना बोलावून अमित शहा यांच्याकडून शिवसेना-भाजप युती मजबूत असल्याचे दाखवण्यात येत आहे. अमित शहा हे ३० मार्चला आपला उमेदवारी अर्ज … Read more

उद्धव ठाकरेंवर केलेली टीका चांगलीच भोवली… उमेदवारी अडचणीत

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | भाजप खासदार किरीट सोमय्या यांची ईशान्य मुंबईतील उमेदवारी अडचणीत आली आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती, त्यामुळे त्यांना आपली उमेदवारी गमवावी लागणार आहे. किरीट सोमय्यांसह आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरे … Read more

उद्धव ठाकरेंची आता ‘पंढरीची वारी’ !

Uthhav Thackray in Pandharpur

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवदर्शनाचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात अयोध्या दौरा करून आल्यानंतर आता ठाकरे ‘पंढरीची वारी’ करणार असल्याचे समजत आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी ठाकरे विठ्ठलाच्या चरणी लीन होणार असून पंढरपूरात जाहीर सभा घेणार आहेत. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. “राममंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या कुंभकर्णाला … Read more