खडसेंना डावलण्याचा प्लॅन दिल्लीत शिजला; राज्यातील भाजप नेतृत्वात ती ताकदच नाही- पृथ्वीराज चव्हाण

पुणे । विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे यांनी संतापून राज्यातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यावरून खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बराच कलगीतुराही रंगला आहे. दरम्यान आज भाजप-खडसे वादावर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण एक गौप्यस्फोट केला आहे. ”आपल्या नेतृत्वाला अडचण होईल म्हणून खडसे नसलेले बरे, हा प्लान दिल्लीत … Read more

पक्षाच्या ‘त्या’ नियमाला पडळकर अपवाद का? खडसेंनाचा चंद्रकांतदादांना परखड सवाल

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत “विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे. पंकजा … Read more

दादा! भाजपाचा उमेदवार म्हणजे पराभव निश्चित, त्याकाळापासून मी मार्गदर्शक आहे – एकनाथ खडसे

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं टिकत वाटपात डावल्यानंतर खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत एकनाथ खडसे यांना पक्षानं भरपूर दिलं आहे, असं सांगत खडसे यांच्याविषयीची यादीच त्यांनी सांगितली होती. त्याचबरोबर … Read more

देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस, ते सहन करतात म्हणून काहीही म्हणायचं काय- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच तिकिट नाकारल्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस असून ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष … Read more

खडसेंचे आरोप फेटाळण्यासाठी चंद्राकांतदादांनी केलं संघाला समोर, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचं तिकिट का नाकारण्यात आलं यामागचे कारण दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली. “भाजपा आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंडयामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंडयाचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, … Read more

एकेकाळी फडणवीसांची शिफारस मीच केली होती, त्याचीच आज शिक्षा भोगतोय- एकनाथ खडसे

जळगाव । भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राज्यातील पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशा वेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस मीच केली होती त्याचीच आज शिक्षा मी भोगतोय, अशी खदखद प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. भूतकाळात विधानसभेचा विरोधी पक्षनेता असताना मीच भाजप नेते … Read more

मला काँग्रेसकडून ऑफर होती; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव । विधानपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती आणि भाजपच्या ६-७ आमदारांनीही क्रॉस व्होटिंग करण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र आपण ही ऑफर नाकारली, असा दावाही खडसे यांनी केला. भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकालल्यानं खडसे सध्या पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशातच आपल्याला … Read more

राज्यसभा नाही दिली किमान विधानपरिषदेची तर जागा द्या!- एकनाथ खडसे

जळगाव । येत्या 21 मे रोजी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मुंबईत निवडणूक होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं उमेद्वारीपासून डावलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेच्या जागेची उमेदवारी देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी शिफारस होऊनही निवड झाली नाही, पण आता विधानपरिषदेसाठी तरी माझा विचार करावा, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी … Read more

खंत! आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही- एकनाथ खडसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाकडून एकनाथ खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सुत्रांची माहिती आहे. आपल्याला विधानसभेतच आपल्याला रस होता, आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही अशी तीव्र नाराजीची भावना एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा दर्शवली. गेल्या वर्षी विधानसभेसाठी भाजपने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नव्हती. विधानसभा लढवण्याची पूर्ण तयारी केलेल्या खडसेंनी विधानसभेसाठी आपला अर्जही … Read more

दादा खरं बोलले, मेगाभरतीमुळेच भाजपनं सरकार घालवलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

पाटील यांच्या याच विधानाचा धागा पकडून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद व्यक्त केली.