शहरवासीयं व्हायरल आजाराने त्रासले; सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांचे प्रमाण जास्त

औरंगाबाद | शहरात गेल्या आठ दिवसांपासून सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याने खासगी डॉक्टरांकडे रूग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतल्या. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजाराचे औषधोपचार सुरू केले आहेत. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता पालिकेच्या … Read more

बँक कर्मचाऱ्यांचा खासगीकरणाला विरोध, ५० कोटींचे बँक व्यवहार ठप्प

औरंगाबाद | बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून बँक अधिकारी, कर्मचारी दोन दिवसांपासून संपावर गेल्याने ५० कोटींचे बँक व्यवहार ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. शहर आणि ग्रामीण भागात संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल तीन हजार बँक कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याविरोधात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनतर्फे … Read more

वाळूज महानगरीत दीड महिन्यात ४२५ कोरोनाबाधित, २ कोवीड सेंटरमध्ये १९१ रूग्णांवर उपचार

औरंगाबाद |  वाळूज उद्योगनगरीला कोरोनाचा विळखा वाढत चालला असून, दीड महिन्यात ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागातील दोन कोवीड सेंटरमध्ये १९१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील मुख्य बाजारपेठा, भाजीमंडई तसेच कंपन्यांमध्ये अनेक जण मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचा वापर करीत नसल्यामुळे कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी … Read more

१ लाख २७ हजार विद्यार्थी देताहेत पदवी परीक्षा, ऑफलाईन परीक्षेसाठी २१२ केंद्रे

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा मंगळपासून सुरू झाल्या. २१२ परीक्षा केंद्रांवर १ लाख २७ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पदवी अभ्यासक्र माच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांना मंगळवार, १६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद, जालना, … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, धर्मगुरु, पुजारी, महंतांना सहकार्य करण्याचे आवाहन

औरंगाबाद | विविध धर्मगुरु, पुजारी, महंत यांनी प्रशासन आणि जनतेतील दुवा व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध धर्मगुरु तसेच धार्मिक स्थळांचे प्रमुख यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. समाजात धर्मगुरूंना मानाचे स्थान आहे. आपण सांगितलेलं लोक ऐकतात. आपला … Read more

बँका बंद!! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

औरंगाबाद : खाजगीकरणाच्या विरोधात 9 बँक अधिकारी कर्मचारी संघटनांनी आजपासून दोन दिवस संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आज शहरासह जिल्ह्यातील जवळपास दोनशे बँकांचे कामकाज ठप्प झाले. सलग तिसऱ्या दिवशी बँका बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र मोठे हाल झाले. जिल्ह्यात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँका च्या खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. … Read more

प्रशासनाचा आगळा वेगळा निर्णय; खाजगी दवाखाण्यासमोर शासन लावणार पाटी

औरंगाबाद : खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अजूनही पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता प्रशासन ज्या डॉक्टरांनी लस घेतलेली नाही, त्यांच्या रुग्णालय दवाखान्या पुढे या डॉक्टरांनी लस घेतलेली नाही, त्यामुळे येथे उपचार घेऊ नका अशा स्वरूपाच्या पाट्या लावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शासनाने लस … Read more

लॉकडाउन संपताच औरंगाबाद रेल्वेस्टेशन ला गर्दी

औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी लॉक डाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. दोन दिवस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी कोरोनाची कोणतीही तमा बाळगली नाही. नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात दिसून आले. कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी म्हणून प्रशासनाने रात्री नऊनंतर संचारबंदी व शनिवार आणि … Read more

व्यापाऱ्यांचा कोरोना चाचणीला प्रतिसाद ; मनपा पथकामार्फत करून घेतली तपासणी

औरंगाबाद: कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोविड चाचणी करून घेणाऱ्या व्यापारी व दुकानदारांची महानगरपालिकेच्या रुग्णालयात गर्दी होत असे. यामुळे मनपा प्रशासनाने आज सोमवार पासून सहा ठिकाणी तपासणी सुरू केली. याला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. सध्या शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. … Read more

औरंगाबाद मध्ये बुधवार पासून हॉटेल, धाबे परमिटरूम मध्ये फक्त पार्सल सुविधा ; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

औरंगाबाद : गेल्या सहा दिवसापासून औरंगाबादेत कोरोनाची वाढते रुग्ण आणि हॉटेलमध्ये होणारी गर्दी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी आज सर्व हॉटेल, परमिटरूम, धाबे इत्यादी ठिकाणी डायनींग सुविधा बंद करून फक्त डिलिव्हरी आणि पार्सल सुविधाच सुरू राहणार असून हा आदेश बुधवारी सकाळी 6 वाजेपासून लागू होणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान औरंगाबादेत अंशतः … Read more